हरियाणा सरकारने दोन दिवसांपूर्वीच राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला होता.आज सरकारने राज्यातील पत्रकारांना आणखी एक सुखद धक्का दिला. राज्य सरकारने ज्यानी सलग वीस वर्षे पत्रकारिता केली आहे आणि ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा निवृत्त पत्रकारांना पाच हजार रूपये मासिक निवृत्ती वेतन देण्याची घोषणा केली आहे.या शिवाय पत्रकारांसाठी आधीपासूनच लागू केलेल्या सामुहिक अपघात विम्याची रक्कम अडिच लाखावरून पाच लाख कऱण्याची घोषणाही मुख्यमंत्री भुपेंद्रसिह हुड्डा यांनी आज केली आहे.
चंदिगड येथे मिट द प्रेस कार्यक्रमाच्या वेळेस हुड्डा यांनी ही घोषणा केली.ते म्हणाले हरियाणा हे देशातील असे पहिले राज्य आहे की ज्या राज्याने आपले मिडिया धोरण तयार केले आहे.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने स्वागत केले असून ङुड्डा यांचे मेल व्दारे आभार मानले आहेत.महाराष्ट्र सरकारने आता तरी पत्रकारांबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन बदलून पत्रकारांच्या दीर्घकालिन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी समितीचे निमत्रक एस.एम.देशमुख यांन ीकेली आहे.महाराष्ट्रात .राज्यातील पत्रकारही आता याबाबत ठोस भूमिका घेम्याच्या तयारीत आहेत.