हरियाणात मतदारांनी वृत्तपत्रांच्या काही मालकांना नाकारले असले तरी हरिभुमीचे मालक कॅप्टन अभिमन्यू यांना मतदारांनी विजयी केले आहे.खरं तर ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते पण त्यांना मंत्रीपदावर तहान भागवावी लागली आहे.अमित शहा यांच्या जवळचे असलेले अभिमन्यू यांना कोणते खाते मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या कॅबिनेट प्रवेशामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा पत्रकारांना वाटते.