अधिस्वीकृती समितीची चार वर्षांपूर्वी मुदत संपल्यानंतर आज पर्यत या समितीची पुनर्रचना केली गेलेली नाही.वारंवार सरकारकडे या संदर्भात अर्ज विनंत्या केल्यानंतरही सरकार अधिस्वीकृती समिती पुनर्गठित करीत नाही.या संदर्भात मराठी पत्रकार परिषदेने जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा तेव्हा समितीवर जाण्यासाठी असंख्य पत्रकारांच्या शिफारशी आल्याने अडचणी येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी देखील या संदर्भात कमालीचे उदासिन असल्याचे दिसतात.किंबहुना अधिस्वीकृती समिती गठित न झालेलीच बरी असेच त्यांना वाटते कारण समिती गठित होत नसल्याने कोणाला अधिस्वीकृती द्यायची किंवा कोणाला नाही हे अधिकारीच ठरवितात.
अधिस्वीकृती समिती गठित कऱण्यात अनुत्सुक असलेल्या अधिकाऱ्यांनी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या पहिल्या विश्वस्त मंडळाची मुदत संपताच ती बदलली.6 जानेवारीला पारित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खालील नव्या सदस्यांना पत्रकार कल्याण निधीवर घेण्यात आले आहे.
1) मधुकर कांबळे (ठाणे )
2) शुभांगी खापरे ( मुंबई)
3) चंदुलाल शङा ( नाशिक)
4) अ़रूण खोरे ( पुणे )
5) माधव कदम ( कणकवली)
6) लक्ष्मण राऊत (जालना)
7) दिलीप एडतकर ( अमरावती )
संघटनाचे प्रतिनिधी
—————————————————————–
1) मराठी पत्रकार परिषद
2) महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटना
3) मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ
4) बृहन्ममुंबई जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ
5) महाराष्ट्र सात्पाहिक वृत्तपत्र संपादक परिषद
6) महाराष्ट्र संपादक परिषद
7)इलेक्टॉनित माध्यमे पत्रकार संघटना
8) महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ
शासकीय सदस्य
————————————————————-
1) प्रधान सचिव -माहिती आणि जनसंपर्क (अध्यक्ष)
2) महासंचालक माहिती व जनसंपर्क – सदस्य
3) संचालक (माहिती) सदस्य सचिव
4) उपसंचालक (लेखा) खजिनदार
5) उपसंचालक ( सार्वजनिक आरोग्य) सदस्य
पत्रकारांना तातडीची मदत देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या उपसमितीवरील यंशवंत पाध्ये आणि राही भिडे यांच्या जागेवर आता मधुकर कांबळे आणि शुभांगी खापरे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.
कल्याण निधीवरील सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन.समितीवरील सर्व पत्रकार मित्रांना विनंती की,या समितीचा जास्तीत जास्त गरजू पत्रकारांना लाभ होईल या दृष्टीने प्रयत्न व्हावेत ही विनंती