सामना दैनिकाच्या मराठवाडा आवृत्तीचे सर्व कर्मचारी, प़तिनिधीं, वार्ताहर यांचं अभिनंदन केलं पाहिजे.. त्यांनी एक स्वागतार्ह पायंडा पाडला आहे.. सामना परिवारातील एक सदस्य माणिक केंद्रे यांचं निधन झाल्यानंतर सर्व सदस्यांनी एकत्र येत आपल्या सहकार्याच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 1लाख 94 हजार रूपयांचा निधी जमा केला आणि तो नुकताच माणिक केंद्रे यांच्या मुलांकडे सुपूर्त केला.. एखाद्या दैनिकाचा पत्रकार गेल्यानंतर त्या दैनिकातील कर्मचारी, पत्रकार एकत्र येतात आणि आपल्या दिवंगत सहकारयांचया कुटुंबियांना मदत करतात असं पहिल्यांदाच घडलं आहे.. अत्यंत स्तुत्य आणि स्वागतार्ह हा प्रयत्न आहे.. प्रत्येक दैनिकातील पत्रकारांनी अश्या पद्धतीचे प्रयत्न केले तर पत्रकारांना कधीच कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत.. सामनाच्या मराठवाडा आवृत्तीचे प़मुख श्री. गणेश तुलसी आणि त्यांच्या सर्व सहकारयांना मनापासून धन्यवाद..