अलिबाग, दि.23 :- सांसद आदर्श ग्राम योजनतील अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावात स्वच्छ पाणी पुरवठा व प्रत्येक घरात शौचालय बांधण्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना खासदार डॉ.किरीट सोमैय्या यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या चिंचोटी सांसद आदर्श ग्राम योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस चिंचोटी गावचे सरपंच नरेंद्र तेलगे, अपर जिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, अलिबाग प्रांत विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागावकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, नोडल अधिकारी तथा गट विकास अधिकारी शरद महाजन तसेच सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित होते.
चिंचोटी गावातील सर्व नागरिकांचे आधार कार्ड, विविध दाखले देण्यासाठी विशेष शिबीरे आयोजित करुन ते काम पूर्ण करावे, या गावातील रस्त्यांवर स्ट्रिट लाईटचे काम तातडीने पूर्ण करावे व याबाबतचा अहवाल सादर करावा. दिनदयाळ ग्राम ज्योती योजनेनुसार प्रत्येक घराला ग्रीडद्वारे कनेक्टीविटी देण्याचे प्रयोजन आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेतील सर्व प्रस्तावित कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, सांसद आदर्श ग्राम योजनेतील कामे करताना काही अडचण असल्यास याबाबत मला माहिती दिल्यास त्याचा वरिष्ठ पातळीवरुन पाठपूरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जा