सोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा..

0
1267

महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या
प़वाहात सामिल व्हा :एस.एम.देशमुख

सांप्रतच्या काळात सोशल मिडियाचं महत्व नव्यानं सांगण्याचं कारण नाही.. सोशल मिडियानं आपलं जीवन व्यापून टाकलं असल्यानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना देखील सोशल माध्यमाची गरज वाटायला लागली आहे.. त्यामुळंच मोठयातलं मोठं चॅनल देखील आमच्या यु ट्यूब चॅनलला सबस्क़ाइब करा अशा जाहिराती करीत आहे. सोशल मिडियाचा वापर आणि युट्यूब चॅनलला लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता पुढील काळ युट्यूब आणि पोर्टलचा आहे हे स्पष्ट आहे… काळाची पाऊलं ओळखून नव्या पिढीतील पत्रकार मोठ्या संख्येनं नव्या व्यासपीठाचा वापर करताना दिसत आहेत..
नवीन माध्यम समोर येत असतानाच या माध्यमातील पत्रकारांना भेडसावणारे प्रश्न देखील समोर येत आहेत.. व्यक्तीगत पातळीवर एकटा पत्रकार या समस्यांचा मुकाबला करू शकत नाही अथवा आव्हानांना सामोरं जाऊ शकत नाही.. संघटीतपणेच नव्या माध्यमातील आव्हानांना सामोरं जाता यावं यासाठीच आम्ही “महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद” ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू केली आहे.. परिषदेच्या नव्या व्यवस्थेच्या माध्यमातून युट्यूब आणि पोर्टल चालवणारया पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.. म्हणूनच सोशल मिडियातील जास्तीत जास्त पत्रकारांनी महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेचा हस्सा होऊन एकजुटीने आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सिध्द व्हावे ही विनंती..
मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची सर्वात जुनी अशी संस्था आहे.. परिषदेने गेल्या 82 वर्षात पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य योजना, बाळशास्त्री जांभेकर स्मारकासह पत्रकारांचे असंख्य प़श्न मार्गी लावले आहेत.. परिषदेने जे प़श्न हाती घेतले ते चिवटपणे लढा देत सोडविले आहेत.. सोशल मिडिया परिषद देखील याच जिद्दीने काम करणार आहे..
सोशल मिडिया परिषदेच्या शाखा सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू करण्यात येत आहेत.. अगोदर जिल्ह्याची टीम निवडली जाईल.. त्यानंतर ही जिल्ह्याची टीम तालुका शाखा स्थापन करील.. हे काम युध्द पातळीवर सुरू आहे.. सोशल मिडिया परिषद ही मराठी पत्रकार परिषदेचीच एक शाखा असल्याने जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषद परस्पर पूरक आणि एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार आहेत..
सोशल मिडिया परिषदेचे राज्य निमंत्रक म्हणून बापुसाहेब गोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.. तर मराठवाडा निमंत्रक म्हणून हिंगोलीचे कन्हैयालाल खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. सोशल मिडियातील ज्यांना परिषदेच्या नव्या प़वाहात सहभागी व्हायचं आहे त्यांनी खालील क़मांकावर संपर्क साधावा ही विनंती
शरद पाबळे
बापुसाहेब गोरे

एस.एम.देशमुख
किरण नाईक
नराठी पत्रकार परिषद, मुंबई

(Visited 47 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here