तांत्रिक अडचणीमुळे आज फेसबुक तब्बल चाळीस मिनिटे बंद पडले.तांत्रिक अडचण काय होती,याचा उलगडा अजून झाला नाही.तसेच जगाच्या किती भागात फेसबुकला या समस्येला तोंड द्यावं लागलं ते अजून स्पष्ट झालेलं नाही.या अडचणीमुळे युजर्सना आपल्या पोस्ट करता आल्या नाहीत.या काळात फेसबुक वेबसाईटवर एक मेसेज फ्लौस होत होता त्यात लिहिले गेले होते की,सॉरी समथिंग वेंट रॉंग.या मसेचबरोबर दोन ऑप्शन येत होते.गो बॅक आणि हेल्प मात्र हे दोन्ही ऑप्शन काम करीत नव्हते.
या पुर्वी फेसबुकला 9 मे 2014 ला अशीच अडचण आली होती सहा महिन्यातली ही तिसरी वेळ आहे की,जेव्हा फेसबुकला तांत्रिक अडचणीला तोंड द्यावे लागले.