पत्रकारांचे होणारे खून,पत्रकारावर सातत्यान होत असलेले हल्ले आणि विविध दहशतीच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा होत असलेला प्रयत्न लक्षात घेऊन चार वर्षापूर्वी महाराष्ट्रातील सोळा संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी सर्वप्रथम केली.त्यापुर्वी देखील अशाी मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्यानं करीत होती.मात्र समितीच्या माध्यमातून या मागणीला संघटीत रूप आले.गेली चार वर्षे मागणी करूनही सरकार कायदा करण्यास टाळाटाळ करीत असले तरी आता अन्य राज्यातही ही मागणी होऊ लागल्याने सरकारला आज ना उद्या त्याची दखल ध्यावीच लागेल.केंद्रीय माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच केंद्र सरकार पत्रकार सुरक्षा कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश जर्नालिस्ट असोशिएशनने नुकतीच लखनाौ येथे एक बैठक घेऊन केंद्राने पत्रकार सुरक्षा कायदा करावा अशी मागणी केली असून तसे पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठविले आहे,राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रावर प्रदेश अध्यक्ष रतन कुमार दीक्षित आणि प्रदेश महामंत्री रमेशचंद्र जैन यांच्या स्वाक्षऱ्या आङेत.अन्य राज्यातून देखील अशा मागण्या होत आहेत.