राजदीप सरदेसाई गेले सुट्टीवर
आयबीएन न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक आणि प्रसिध्द पत्रकार राजदीप सरदेसाई हे आजपासून प्रदीर्घ रजेवर गेलेत.मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने नेटवर्क 18 समुहाची खरेदी चार हजार कोटींना केलीय.या पार्श्वभूमीवर राजदीप रजेवर गेल्याचं समजतंय.राजदीप यांंच्या पत्नी आणि उप मुख्यसंपादक सागरिका घोष या देखील रजेवर गेल्याचं सांगण्यात येतं.सूत्रांच्या माहिती नुसार राजदीप आणि सागरिका पुन्हा कामावर येण्याची शक्यता फारच कमीय.
थेट अंबानी यांनी मालकी घेतल्यानं संपादकीय स्वातंत्र्यावर विपरित प रिणाम होईल अशी भिती सरदेसाई आणि धोष यांना वाटते.त्यातून त्यांनी रजेवर जाण्याचा पर्याय शोधला.आयबीएन नेटवर्कची जबाबदारी आता व्यवस्थापकीय संपादक विनय तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.नेटवर्क 18 समुहात सीएनएन-आयबीएन,आयबीएन-7,सीएनबीसी टीव्ही-18,सीएनबीसी-आवाज,कलर आदि वाहिन्यांचा समावेश आहे.यांच्या काही वेबसाईटस देखील आहेत.