सुकेळी खिडीत दरड कोसळली

0
1421
रायगड जिल्हयात कोसळत असलेल्या पावसाने दरडी कोसळण्याच्या घटना सुरूच आहे.काल पोलादपूर तालुक्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्यानंतर आज मुंबई गोवा महामागार्वर सुकेळी खिंडीत दरड कोसळून मोठा राडोरोडा रस्तयावर आला.त्यामुळे आज दुपारी जवळपास दोन तास महामागार्वरील वाहतूक ठप्प झाली होती.त्यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्यावरील माती बाजुला करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला
दरम्यान – पालकमंत्री सचिन अहिर यांनी आज महाड तालुक्यातील हिकरणीवाडी या रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळील गावास भेट देऊन तेथे पडलेलेल्या रस्त्यावरील भेगांची प्रत्यक्ष पहाणी  करुन ग्रामस्थांना शासन आणि प्रशासन दोघेही भक्कमपणे आपल्या पाठीशी असून काळजी करु नका अशा शब्दात दिलासा दिला.तात्काळ उपाय योजना करण्यासंदर्भात प्रशासनास सूचना दिल्या.
हिरकणीचे सरपंच लक्ष्मण आवकीरकर यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here