जगभरात माध्यम जगतात काय घडतंय,पत्रकारांवर कसे हल्ले आणि अन्याय होतात याची नोंद ठेवणारी ,पत्रकारांसाठी आवाज उठविणारी संस्था म्हणून कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टकडे पाहिले जाते.भारतातील माध्यम व्यवसायातील घडामोडीचे संकलन 1992 पासून ठेवलेल्या सीपीजेने भारतात 27 पत्रकारांच्या हत्त्या झाल्याची माहिती दिली आहे.अर्थात ही माहिती परिपूर्ण नाही,हत्त्या झालेल्या पत्रकारांची संख्या यापेक्षा मोठी आहे.ज्यांच्या हत्त्या झाल्या त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला होता.असंही एका रिपोर्टमध्ये सीपीजेने म्हटले आहे.सीपीजेने आणखी एक सत्य सांगितलं आहे ते म्हणजे,हत्त्या झालेल्या प्रकरणातील एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही.आम्ही पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी का करतो हे यावरून स्पष्ट होईल.विद्यमान कायदे पत्रकारांना संरक्षण देण्यास समर्थ नाहीत हेच सीपीजेने अधोरेखित केले आहे.–