सिरीयात सुरू असलेल्या गृहयुध्दाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या लंडन टाइम्सचे पत्रकार एथोनी लायड यांची हत्त्या केली गेली.त्याचे छायाचित्रकार जैक हिल जखमी अवस्थेत थोडक्यात बचावले.सिरीयाच्या अलैप्पो भागात ही घटना घडली.काही दिवसांपुर्वी ताल ऱिफत या अतिरेकी संघटनेने या पत्रकारांचे अपहरण केले होते.पत्रकारांनी तेथून पलायन कऱण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळेस त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला गेला.सिरीयात आतापर्य़त 62 पत्रकारांच्या हत्त्या करण्यात आल्या आहेत.