17 नंतर सारं काही सुरळीत होईल?

0
915

सिंधुदुर्गमध्ये आज घडलेल्या दोन गोष्टींकडं दुर्लक्ष करता येणार नाही.पहिली म्हणजे राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या सभेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.यावरून एक गोष्ट सिध्द होते की,सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी दीपक केसरकर यांच्याच बरोबर आहे.म्हणजेच दीपक केसरकर यांना बाजुला करणं याचा दुसरा अर्थ राष्ट्रवादी सिंधुदुर्गातून संपवणं असा आहे.शरद पवार हे होऊ देणार नाहीत.त्यामुळं निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत सारं काही सुरळीत होईल असं माझं पुनश्च म्हणणं आहे.
नारायण राणे यांनाही असं वाटतंय की,दीपक केसरकरांनी शरद पवारांकडं दिलेला राजीनामा हे नाटक आहे.त्यामुळंच त्यांनी आज एका जाहीर सभेत बोलताना केसरकर यांनी राजीनामा देऊनच पहावा त्याचं मी डिपॉझिट जप्त करून दाखवतो. असे वक्तव्य केलं आहे. तात्पर्य असं की,राष्ट्रवादीचे नेते वरिष्ठ पातळीवर काहीही बोलत असले तरी तेही मनापासून दीपक केसरकर यांच्याबरोबरच आहेत ही नारायण राणे यांची समजूत आहे.ती चुकीचीही नाही.कारण केसरकर यांचा राजीनामा शरद पवारांनी अजून विधानसभेच्या सभापतींकडं पाठविलेला नाही.आमदारानं राजीनामा पक्षाध्यक्षाकंडं देऊन उपयोग नसतो,तो विधानसभेच्या सभापतींकडं पाठवावा लागतो.केसरकर यांनी तसं केलंलं नाही.हे ठरवून झालेलं आहे असं माझ ंमत आहे.एक मात्र खरं की,बाळ भिसे यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपद लगेच तरी मिळणार नाही.म्हणजे या वादात त्यांचा राजकीय बळी गेलाय असं म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here