न्या.लोया यांच्या मृत्यू नैसर्गिक आहे..त्यात संशयास्पद असं काहीच नाही.असं भाजपचे नेते चर्चेत जोर जोरात सांगत असले तरी लोया मृत्यू प्रकरणी माध्यमांनी काहीच बोलू नये,दाखवू नये असा त्यांचा कटाक्ष दिसून येतो.सामच्या निमित्तानं या विषयावर मंडळी किती संवेदनशील आहे हे पुन्हा दिसून आलंय.
सामवर ‘आवाज महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम परवा झाला.न्या,लोया यांचा मृत्यू नैसर्गिक की संशयास्पद असा या कार्यक्रमाचा विषय होता.या कार्यक्रमात ज्यांनी या प्रकरणाला नव्यानं वाचा फोडली ते निरंजन टकले,न्या,कोळसे पाटील,संजय ढाक,आणि अतूल लोंढे आदि तज्ज्ञ सहभागी झाले होते.संजय आवटे अँकरिंग करीत होते. दररोजचा शिरस्ता असा असतो की,रात्री नऊ वाजता लाइव्ह झालेल्या या कार्यक्रमाचं दोन-तीन वेळा पुनपर्प्रक्षेपणं होतं..मात्र न्या.लोया प्रकरणाच्या चर्चेचा जो एपिसोड होता त्याचं पुनर्प्रेक्षेपण केलं गेलंच नाही.तसा आदेश वरिष्ठाकडून सामच्या अंतर्गत व्हॉटसअॅपवरून आल्याचं सांगितलं जातं.मुलात सामनं लोया प्रकरणावर चर्चा करावी हेच कौतूकास्पद आणि अभिनंदनीय होतं.मात्र हा विषय घेणं बहुदा साम व्यवस्थापनाला आवडलेलं नसावं.कारण ‘सीम टीव्हीच्या अंतर्गत व्हॉटसअॅप ग्रुपवरून वरिष्ठांकडून असा आदेश दिला गेला की,लोया मृत्यू प्रकरणी काही मजकूर चालवू नका.उलट सरसंघचालक मोहन भागवत यांची व्हिज्युअल्स पन्नास वेळा चालवा’स्वतः निरंजन टकले यांनी आपल्या फेसबुक वॉलवर ही माहिती दिली आहे.त्याबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केलाय.संपादकांनी यावर रोखठोक भूमिका घेतली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.
संपादक संजय आवटे यांनी मात्र हे सारं फॅब्रिकेटेड असल्याचं म्हटलं आहे.
मागे एका चॅनलच्या वेबसाईटवरून संपादकांनी लिहिलेला जय शहा यांच्यासंदर्भातला लेख असाच संपादकांना न विचारता काढून टाकला गेला होता.तसेच इंग्रजी दैनिकानं देखील अमित शहांना नाराज करायला नको म्हणून बातमी वेबसाईटवरून हटविली होती.हे सारं करता यावं म्हणूनच छोटी वृत्तपत्रे बंद पडली पाहिजेत असं धोरण आहे.त्यामुळंच नुकतीच सरकारी यादीवरून 324 स्पाताहिकं आणि दैनिकं उडविली गेली आहेत.सकाळचे व्यवस्थापन भाजपची संबंधित नाही.तरीही न्या.लोया प्रकरणी त्यांनी बचावात्मक पवित्रा का घ्यावा असा प्रश्न आता विचारला जात आहे.सामचे व्यवस्थापन परिवाराशी संबंधित नाही असं असतानाही सामनं न्या.लोया प्रकरणी बचावात्मक पवित्रा का घ्यावा हे अनाकलनीय आहे.सामवर नक्कीच मोठा दबाव आलेला असावा अशी चर्चा आहे.
बधा आपल्या वॉलवर निरंजन टकले काय म्हणतात ते..
‘साम tv मधील स्टाफ वर हा असा दबाव आहे……”न्या. लोयांबद्दलचा कार्यक्रम रिपीट करू नका पण मोहन भागवत दुसऱ्या एका कार्यक्रमात दिसतील हे आवर्जून पहा”… हा दबाव कोण आणतंय???? या दबावाला साम मधील कोण पत्रकार/संपादक लाचारीने बळी पडत आहेत??? Sunjay Awate, Nilesh Khare; तुम्ही हे उघड बोलायला हवं….ही अग्निपरीक्षा द्यायलाच हवी….तरच लोक पत्रकारितेवर आणि तुमच्यावरही विश्वास ठेवतील’ ……