मुंबईः आम्ही सामनाची दखल घेत नाही असं भलेही राष्ट्रवादीचे नेते म्हणत असतील पण आजच्या सामनातील अग्रलेखाची दखल राष्ट्रवादीला घ्यावीच लागली.अजित पवार यांच्याविरोधात आज प्रसिध्द झालेल्या सामनातील अग्रलेखानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी सामनाच्या अंकाची होळी केली.पुण्यात अभिनव चौकात सामना अॅाफीससमोर राष्ट्रवादी कॉगे्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली सामनाचे अंक जाळण्यात आले.या प्रकारानंतर सामनाच्या कार्यालयासमोरील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.युवा एल्गार मेळावा संपल्यानंतर कोल्हापुरातही सामना अंकाची होळी केली गेली.अजित पवार यांची खोपडी रिकामी असून ते एक गटारी कीडा आहेत,गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो,भ्रष्टाचाराच्या प्राण वायूवर तो जगतो अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नसल्याचे आजच्या सामनाच्या अंकात म्हटले आहे.या अग्रलेखानं तमाम राष्ट्रवादीला चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचे दिसते आहे.
‘सामना’च्या अंकाची पुण्यात होळी
(Visited 139 time, 1 visit today)