पत्रकारांच्या मुलांचा सत्कार

0
779

सातारा जिमप संघाचा आगळा-वेगळा उपक्रम
सातारा जिल्हा मराठी पत्रकार संंघाने एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलाय.बऱ्याचदा इतरांच्या उठाठेवी करताना पत्रकारांचे स्वतःकडे ,स्वतःच्या कुटुंबाकडेच दुर्लक्ष होते.आपल्या घरच्यांचंही कौतूक करायचंं आपण विसरतो.मात्र सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने दहाबी -बारावीत विशेष प्राविण्या मिळविलेल्या जिल्हायीतील पत्रकारांच्या मुलांचा सत्कार समारंभ आयोजित केलाय.एक स्तुत्य पायंंडा पाडला आहे.उद्या 19 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि छत्रपती उदयनराजे भोसले याच्या उपस्थितीत हा कार्यर्कम होत आहे.दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होईल.

काही दिवसांपुर्वीच आपसातील मतभेद बाजुला ठेऊन जिल्हयातील पत्रकार सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत.संघाच्या माध्यमातून आता विविध कार्यक्रम राबविण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.अध्यक्ष हरिष पाटणे ,कार्याध्यक्ष शरद काटकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या कार्यास शूभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here