मुंबईच्या सांताक्रुझ भागातील गोळीबार नगरात झालेल्या सिलेंडर स्फोटाचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या मिडिया प्रतिनिधींवर स्थानिक गुंडांनी हल्ला केल्याने काही महिला पत्रकारांसह तीन ते चार पत्रकार जखमी झाले आहेत.स्फोटाचे वृत्त समजल्यानंतर एबापी माझा,टीव्ही-9 तसेच अन्य वाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच प्रिन्ट मिडियाचे पत्रकार आणि छायाचित्रकार घटनास्थळी जमा झाले.आणि शांतपणे घटनेचे कव्हरेज करू लागले .तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पाच-ते सहा जणांच्या एका टोळक्याने महिला पत्रकारांना अश्लिल शिविगाळ करायला सुरूवात केली.महिला कॅमेरामनचवळचे कॅमेरे हिसकावून घेतले.उपस्थित पत्रकारांनी त्यासा आक्षेप घेतला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.यामध्ये टीव्ही-9चे पत्रकार श्रीकांत शंखपाळ गंभीर जखमी झआले आहेत.तसेच टीव्ही -9च्या महिला कॅमेरामन तसेच एबीपीमाझाच्या महिला रिपोर्टरलाही मारहाण करण्यात आली आहे.या प्रकरणाची तक्रार निर्मळ पोलिसात देण्यात आली असून गुन्हे नोंदणीचं काम तेथे सुरू आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घठनेचा तीव्र शब्दात निषेध करीत असून गुंडांना तातडीने अटक करावी अशी मागणी करीत आहे.