मंगळवेढ्याच्या डीवायएसपीची अरेरावीष
सांगोल्याच्या पत्रकारास बेदम मारहाण
सागोला येथील पत्रकार सचिन मधुकर भुसे यांना आज मंगळवेढा येथील डीवायएसपी दिलीप जगदाळे यांनी प्रचंड मारहाण केली.मारहाणीमुळे भुसे यांना चक्कर येऊन ते खाली पडले अशी तक्रार त्यांनी विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे केली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की,बातमीच्या संदर्भात भुसे आज सागोंला पोलिस स्टेशनमध्ये गेले होते.त्यांच्या तोंडात मच्छर गेल्याने त्यांनी थुंकन्याचा प्रयत्न केला.दिलीप जगदाळे यांनी हा प्रकार पाहिल्याने ते पत्रकाराकडे धावले आणि त्यांनी भुसे यांना शिविगाळ आणि मारहाण करायला सुरूवात केली.या मारहाणीत भुसे यांना चांगलाच मार लागला आहे.त्यानंतरही जगदाळे यांनी भुसे यांना पाच तास पोलीस स्थानकात बसवून ठेवले.हा प्रकार कळताच सोंगोल्यातील सर्व पत्रकार जमा झाले असून दिलीप जगदाळे यांच्या विरोधात पोलीस महानिरिक्षकांकडे तक्रार केली आहे.जगदाळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी सांगोल्यातील पत्रकारांनी केली आहे.26 जानेवारीपर्यंत या संदर्भात काहीच निर्णय घेतला गेला नाही तर सांगोल्यातील पत्रकार 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्ल्याचा निषेध केला असून दिलीप जगदाळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.सांगोल्यातील पत्रकाारांच्या लढ्यात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद त्यांच्यासमवेत असून गरज भासल्यास समितीचे पदाधिकारी सांगोल्यातील आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती समितीच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.