सांगली-मिरजमध्ये केबल वॉर

0
940

आज सकाळपासून व्हॉटसऍपवर एक बातमी संचार करीत होते.मिरजमध्ये एका पत्रकारास  गोळ्या घालून जखमी कऱण्यात आले आहे.बातमी वाचून मिरज आणि सांगलीतील काही पत्रकार मित्रांशी संपर्क साधला.त्यातून जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती.
वाद दोन केबलवाल्याचा होता.एकाने एका केबल चालकाबद्दल काही बातमी दाखविली.दुसऱ्याने त्याचे दारूचे दुकान काढले.यातून गोळीबार आणि मारामारी झाली.महत्वाच्या ठिकाणी गोळीबार झाला म्हटल्यावर वाहिन्यांवरून त्याची बातमी येणे स्वाभाविक होते.बातमी आल्यानंतर केबलचालक खवळले आणि त्यांनी आयबीएन-लोकमतचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांना जिवे मारण्याची धमकी दिली.अश्लील शिविगाळही केली.टीव्ही-9चे प्रक्षेपण बंद तर केलेेच पण त्याचबरोबर आयबीएनसह अन्य वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद कऱण्याची धमकीही दिली.या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून धनेश शेट्टे यांच्या विरोधात 504,506,507,427 आणि आयटी कायदा 66 ए नुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगलीतील सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी एकत्र आले.त्यात आयबीएन-लोकमतचे आसिफ मुरसल,दूरदर्शनचे शिवाजी कांबळे,झी-24तासचे रवींद्र कांबळे,टीव्ही-9 रवींद्र कांबऴे,,एनडीटीव्हीचे रोबिन डेव्हिड,आजतकच्या स्वाती चिखलीकर,नवजागृतीच्या जयश्री फडके,गर्जा महाराष्ट्रचे अरूण मोडक,सामचे विजय पाटील,नवजागृीचे प्रवीण शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली.त्यानंतर ही कारवाई कऱण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here