सांगली जिल्हयातील पत्रकारांनी आपली अभूतपूर्व एकी दाखवत 2ऑक्टोबरला शहरात दणदणीत मोर्चा काढला.आता सांगली जिल्हयातील पत्रकारांनी उद्या निर्धाऱ मेळाव्या आयोजन केले आहे. सांगलीतील मराठा समाज सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होत आहे.या मेळाव्यास मी उपस्थित राहणार आहे.कायदा आणि पेन्शन आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळविणारच हा निर्धार सरकारच्या कानी घालण्यासाठीचा हा मेळावा आहे.सरकारने आता राज्यातील पत्रकारांचा जास्त अंत पाहू नये,हे ही सरकारला ठणकावून सांगितले जाणार आहे.मेळाव्यास सांगलीच्या मेळाव्यास नजिकच्या जिल्हयातूनही पत्रकार उपस्थित राहणार आहेत.असे मेळावे प्रत्येक जिल्हयात घेऊन पत्रकारांना एकजूट कऱण्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा मानस आहे.16 तारखेला आम्ही नांदेडमध्ये आहोत.नांदेडच्या बैठकीत राज्यातील तालुका अध्यक्षांचा एक भव्य मेळावा घेण्याबाबतचा निर्णय होणार आहे.सांगलीच्या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सांगली जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केले आहे.–