सांगली जिल्ह्याला रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर
मुंबई : सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाला यंदाचा रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन ना़ईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी आज केली आहे..
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकारांच्या हक्कासाठी च्या लढयात हिरीरिने भाग तर घेतलाच त्याचबरोबर पत्रकार आरोग्य, पत्रकार विमा सारखे उपक्रम राबवून जिल्हयातील पत्रकारांना दिलासा दिला आहे.. जिल्हा संघाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यातही जिल्हा संघाने विशेष लक्ष दिले असून जिल्हयातील पत्रकारांची सर्वात मोठी आणि भक्कम संघटना असा लौकिक जिल्हा संघाने मिळविला आहे. गरजू पत्रकारांना आर्थिक मदतही संघाच्यावतीने केली गेली आहे..
समाजाचे आम्ही काही देणे लागतो याची जाणीव ठेवत जिल्हा आणि तालुका संघाने विविध सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा ठसा उमटविला आहे.. पुराच्या वेळेसही संघाच्या अनेक सदस्यांनी जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली आहे.. पुरस्कार देताना यासर्व गोष्टींचा विचार केला गेल्याचे परिषदेच्या प़सिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे..
यापुर्वी नाशिक, भंडारा, पुणे, बीड, नांदेड जिल्हा संघाना हा पुरस्कार दिला गेला आहे..
८ फेब्रुवारी राजी अक्कलकोट येथे होत असलेल्या तालुका पदाधिकरयांचा मेळाव्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे..
पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर, माजी जिल्हा अध्यक्ष जालंधर हुलवान, नूतन अध्यक्ष अविनाश कोळी आदिंचे परिषदेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे..