राज्यातील पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाही.2016 च्या पहिल्या सव्वा दोन महिन्यात राज्यात दहा पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.बातमीच्या कारणांवरूनच हे हल्ले झाल्याचे वास्तव समोर आले आहे.यातील बहुतेक प्रकरणात तक्रारी दिल्या गेल्या मात्र एन.सी.दाखल झालेल्या असल्याने पत्रकारांवर हल्ले कऱणारे आरोपी मोकाट फिरताना दिसत आहेत.पत्रकारांवर हल्ले कऱणार्यांना किमान वचक बसावा यासाठीच पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा ठरवावा आणि पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावेत अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मागणी करीत आहे.
थेट शारीरिक हल्ल्यांबरोबरच सहा पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या घटना राज्यात घडलेल्या आहेत .तर चार पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न झाला आहे,,मुंबईत एका पत्रकाराचे अपहरण झाले होते.
सव्वादोन महिन्यात 10 पत्रकारांवर हल्ले