————————–
पत्रकार हल्ला विरोधी कायदा कऱण्यासाठी कायद्याचा मसुदा सरकारनं तयार केला आहे.त्यात दुरूस्त्या सूचविण्यासाठी तो मसुदा विरोधी पक्ष ते तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे पाठविण्यात आला होता.समितीच्यावतीने त्यात काही दुरूस्त्या सूचविण्यात आल्या आहेत.मात्र त्यानंतर शासकीय पातळीवर काही हालचाल नाही.9 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.त्यादृष्टीने सरकारवर दबाब आणण्यासाठी जिल्हा,तालुका पत्रकार संघ तसेच अन्य संघटनांनी आणि व्यक्तीगतरित्या पत्रकारांनी आपआपल्या भागातील आमदारांकडून पत्रकार हल्ला विरोधी कायदा आणि पत्रकार पेन्शन योजनेस पाठिंबा असल्याचे पत्र मिळवून ते पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,द्वारा मराठी पत्रकार परिषद,प्रशासकीय अधिकारी महाविद्यालय वसतीगृह आवार,9 हजारीमल सोमाणी मार्ग,छत्रपती शिवाजी टर्मिनस मुबई-1 या पत्त्यावर पाठवून द्यावे.इमेलवर पाठवायचे असल्यास ते smdeshmukh13@gmail.com वर पाठवावे.ही सारी पत्रं एकत्र करून ती 10 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना सादर केली जाणार आहेत.तेव्हा पत्रकार मित्रांना विनंती की,मुख्यमंत्र्यांच्या नावे प्रत्येक आमदाराकडून हे पत्र मिळवावे.
आपल्या आंदोलनास यश येताना दिसत आहे.बस्स आणखी एक धक्का द्यायचा बाकी आहे.तेव्हा प्लीज…