पत्रकार म्हणून ज्यांना जनतेनं स्वीकारलेलं असतं ते राजकारणात गेले तर जनता त्यांना स्वीकारत नाही हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलं.लोकसभा निवडणुकीत अनेक पत्रकार आपलं नशिब आजमावत होते,त्यातील बहुतेक जण आम आदमीच्या तिकिटावर उभे होते मात्र बहुतेक जण प्रचंड मताधिक्यानं पराभूत झाले.मतदारांनी त्याना बजावलं की,तुम्हाला जो रोल दिला गेलाय तोच करीत राहा.
शाजिया इल्मी गांजियाबाद मधून आपतर्फे उभ्या होत्या.व्हि.के.सिंह यांनी त्याचा पराभव केला.व्हिकेसिंह यांना 5 लाख 68 हजार मतं मिळाली.
चांदणी चौक दिल्लीतून आशुतोष गुप्ता रिंगणात होते.ते डॉ.हर्षवर्धन यांच्याकडून 1,34,983 च्या फरकानं पराभूत झाले.
पी.चिदंबरम यांना चप्पल मारल्याच्या घटनेनं प्रकाशित आलेले जनरैल सिंह बॅटरी चिन्हावर निवडणूक लढवत होते.त्यांनाही आप पार्टीचा पाठिंबा होता.ते पराभूत झाले.याच ठिकाणी अपक्ष जनरलसिंह नावाचा आणखी एक उमेदवार उभा होता.
नवी दिल्ली मतदार संघातून आपचे आशिष खेतान देखील पराभूत झाले.भाजपच्या मीनाक्षी लेखी .यांनी 1 लाख 62 हजार708 मतांनी पराभूत केले.
पत्रकारांचे हे पराभव नक्कीच दुःखद आहेत.ही मंडळी लोकसभेत गेली असती तर किमान पत्रकारांचे काही प्रश्न मार्गी लागले असते.
Don’t worry you will have Arun Shourie in Govt. Don’t feel sad on AAPTards.