आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी माध्यमांची मुस्कटदाबी केली .आज आणीबाणी नाही पण देशात आणीबाणीसदृश्य स्थिती नक्कीच आहे.कारण सरकार “राष्ट्रविरोधी” (“anti-national”) आणि trouble makers पत्रकारांवर नजर ठेऊन आहे.राष्ट्रविरोधी याचा अर्थ सरकार विरोधी हे स्पष्ट आहे.राजकीय उद्देशानं (“political”“or vested”) किंवा अन्य काही कारणांंनी सरकार विरोधात लिखाण करणार्या पत्रकारावर Intelligence Bureau (IB) लक्ष ठेऊन असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे.कन्हय्याकुमार प्रकरणाच्या वेळेस काही माध्यमकर्मींनी कन्हय्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता.तेव्हा पासून सरकारनं अशी मोहिम सुरू केली आहे.असही आयबीच्या एका वरिष्ठ अधिकार्याच्या हवाल्यानं वेबसाईटनं म्हटलं आहे.एनडीटीव्हीवर जसा देशद्रोहाचा आरोप ठेवत चॅनलचं प्रक्षेपण एक दिवस बंद ठेवण्यास फर्मावलं गेलं होतं.ते नंतर झालं नसलं तरी त्यातून सरकारची मानसिकता समोर आली होती.त्यानंतर दोन प्रादेशिक चॅनल्सवर बंदी घातली गेली होती.आता थेट सरकारविरोधी लिखाण करणारे पत्रकार सरकारच्या रडारवर असल्याचे सांगितले जाते.
विविध राज्यात असे ( सरकार विरोधी ) पत्रकार कोण आहेत ? त्याबाबतचे inputs राज्याराज्यातील पोलिसांना आयबी मार्फत दिले जात असल्याचा वेबसाईटचा दावा आहे.ज्या पत्रांचा विशिष्ठ agendas आहे त्यांच्यावर विशेष नजर ठेवली जात आहे.महाराष्टातही अशा सरकार विरोधी लिखाण कऱणार्या पत्रकारांची यादी सरकारकडं तयार असल्याचं समजतं.त्यासाठी माहिती आणि जनसंपर्कचीही पोलीस मदत घेत असल्याची माहितीही पुढं आली आहे.हे सारं धक्कादायक आहे.
हा प्रकार धक्कादायक आहे राष्ट्रविरोधी लिखाणाबद्दल कारवाई ठीक परंतु सरकार निर्णयाबद्दल मत मांडलेच पाहिजे