सरकारी संवाद माध्यमे

0
1130
*माध्यमं संवादाची* :  *जनतेच्या विश्‍वासाची*
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य करिअरची निवड अत्यंत महत्त्वाची असते. योग्य करिअरची निवड करण्याचे ठरवल्यानंतर या दृष्टीने आवश्यक पात्रता काय, कोणता अभ्यास करायचा, तो कसा करावा या बाबी जाणून घेणे आवश्यक ठरते. यासाठी योग्य मार्गदर्शन, अचूक व परिपूर्ण माहिती मिळणे गरजेचे असते. अशा अचूक व परिपूर्ण माहितीचा खजिना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विविध माध्यमांतून उपलब्ध करून दिला आहे.
योग्य वेळी आवश्यक माहिती मिळाल्यास ती निश्‍चितच उपयुक्त आणि वेळ वाचवणारी ठरते. करिअरविषयक माहितीबरोबरच शासनाचे महत्त्वाचे निर्णय, योजना, कार्यक्रम, उपक्रम, ध्येयधोरणे यांचीही माहिती वेळोवेळी करून घेत स्वत:ला अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. त्यादृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने दरमहा प्रकाशित होणार्‍या मराठी लोकराज्य, ऊर्दू लोकराज्य, महाराष्ट्र अहेड (इंग्रजी) या मासिकांची आपल्याला निश्‍चितच मदत होईल. या मासिकांमधून ‘प्रेरणा’’ या सदराअंतर्गत प्रसिद्ध होणार्‍या यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती प्रेरणा देणार्‍या असतात. याशिवाय विविध सदरांमधून मिळणारी माहिती स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत पूरक असते. ही मासिके बूक स्टॉल किंवा जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतात. शिवाय ऑनलाइनद्वारेही (https://dgipr.maharashtra.gov.in) वर्गणीदार होता येते. या नियतकालिकांची वार्षिक वर्गणी पुढीलप्रमाणे: मराठी लोकराज्य 100 रुपये, उर्दू लोकराज्य 50 रुपये व महाराष्ट्र अहेड 500 रुपये.
*करिअरनामा*
महासंचालनालयाचा दुसरा उपक्रम म्हणजे महान्यूज वेबपोर्टल होय. www.mahanews.gov.in  या वेबपोर्टल मधील करिअरनामा आणि नोकरी शोधा, यशकथा, नेटभेट, योजना ही सर्व सदरं प्रत्यकाने वाचावी अशी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर वाचली जातात. करिअरनामा सदरात गेल्या वर्षी विविध अभ्यासक्रम, शिष्यवृत्त्या आणि नोकरी विषयक जवळपास 190 लेख प्रसिद्ध करण्यात आले.  हे लेख महान्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमधूनही प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ते समाज माध्यमातूनही आपल्यापर्यंत पोहोचले असतीलच. याबरोबरच महान्यूजमधील यशकथा हे सुद्धा अत्यंत उद्बोधक आणि प्रेरणादायी सदर आहे. नेटभेट या सदरामधूनही विविध मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती, मनोगत प्रसिद्ध होत असतात, जी आपणास निश्‍चितच मार्गदर्शक, प्रेरक ठरतील.
*समाज माध्यमे*
विविध समाजमाध्यमांद्वारे महासंचालनालयाकडून महत्त्वाचे निर्णय, उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात.
https://twitter.com/MahaDGIPR हे ट्विटर हँडल व
www.facebook.com/dgipr  या फेसबूक पेजवरूनही उपयुक्त माहिती प्राप्त करता येते. व्यक्तिमत्व विकासासाठी महासंचालनालयाची माध्यमे विश्‍वासार्ह आणि उपयुक्त आहेत.
*दिलखुलास – जय महाराष्ट्र*
महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार ते शनिवार सकाळी 7.15 ते 7.30 या वेळेत प्रसारित होणारा ’दिलखुलास’ कार्यक्रम, दूरदर्शनवरून दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वा. प्रसारित होणारा ‘जय महाराष्ट्र’ हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे. सर्वांनी हे कार्यक्रम आवर्जून पाहायला हवे. वेगवेगळ्या विषयांची माहिती देणारे उद्बोधक असे विषय, मुलाखती या कार्यक्रमांमधून प्रसारित होत असतात.
– *देवेंद्र भुजबळ* 
संचालक (माहिती/वृत्त)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here