शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढल्यास आमचा पक्ष देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्टीकऱण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.आपण फक्त समविचारी पक्षांशीस युती करू असंही त्यानी ठामपणे सांगितले.
कर्जत येथील दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि संजय राऊत आपल्याला भेटल्याचे मान्य केले.
ते म्हणाले,मला वाटतं सेना सरकारमध्ये समाधानी नाही तथापि पाठिंबा काढण्याबाबत उध्दव आपल्याशी काही बोलले नसल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांनी कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचं कौतूक करताना सांगितले की,राहूल गांधींकडं कौशल्य आहे आणि कष्ट कऱण्याची त्यांची तयारीही आहे.गांधी घराणं हे कॉग्रेसला एक ठेवण्यातला महत्वाचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.