सरकारनामा येतंय..

0
1611

सकाळ वृत्तपत्र समुहानं अगोदर कृषीला वाहिलेलं अ‍ॅग्रोवन हे दैनिक सुरू केलं.आता केवळ राजकारणाला वाहिलेले सरकारनामा हे दैनिक सुरू केले जात आहे.आपलं सारं आयुष्यच राजकारणग्रस्त झालेलं असल्यानं या दैनिकाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल हे जरी खरं असलं तरी मग सकाळमध्ये काय वाचायचं हा प्रश्‍न पडणार आहे.सरकारनामामध्ये केवळ बातम्या असतील की,त्यावरचं विश्‍लेषण असेल हे अंक समोर येईल तेव्हा समजणार आहे.मात्र सकाळ आणि अभिजित पवार यांच्या उपक्रमशिलतेचं स्वागत केलं पाहिजे.प्रिन्टची सद्दी संपली अशी चर्चा सर्वत्र सुरू असताना अभिजित पवार आणखी एक दैनिक सुरू करीत आहेत त्याचं स्वागत केलं पाहिजे.सरकारनामाबद्दल सार्‍यानाच उत्सुकता आहे.सरकारनामासाठी शुभेच्छा.–

(Visited 527 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here