अर्ज करा,पुरस्कार मिळवा
महाराष्ट्र सरकारच्यावतीनं पत्रकारांसाठी असलेल्या उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीनं अर्ज मागविण्यात आले आहेत.31 मार्च 2014पर्यत अर्ज दाखल करता येतील.
राज्यस्तर आणि विभागीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या रक्कमा चांगल्या असल्या तरी पुरस्काराचे निकाल कधी जाहीर होतील आणि त्या पुरस्कारांचे वितरण कधी होईल हे मात्र साक्षात ब्रम्हदेवही सांगू शकत नाही.अर्ज भरायचा आणि आफण अर्ज भरला होता हे विसरून जायचं.अचानक कधी डीआयओंचा फोन आला तर आपणास पुरस्कार मिळाला असे समजायचे.
या स्पर्धांना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद बघता हे पुरस्कार स्पर्धेच्या स्वरूपात न देता जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून त्या त्या जिल्हयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकाराची नावे मागवून त्यांना पुरस्कार द्यावेत अशी सूचना मराठी पत्रकार परिषदेने केली होती.या पध्दतीतून पन्नास टक्के वशिलेबाजी होईल असे गृहित धरले तरी पन्नाश टक्के पत्रकारांना तरी न्याय मिळेल आणि आपणास पुरस्कार अर्ज न करता मिळाला याचा आनंद पत्रकाराला मिळेल.पण सरकारी खाक्या त्याला कोण काय करणार,असा.
काहीही असले तरी पुरस्कारांच्या रक्कमेचा विचार करता राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे.या संबंधिची अधिक माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे किंवा सरकारच्या डीजीपीआयआर च्या वेबसाईटवर मिळू शकेल.