समुद्रातील हालचाली बदलल्या

0
724

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या किनारपट्टीवर ताशी 60 ते 70 किलो मीटर वेगानं वारे वाहत असल्याने समुद्रही खवळला आहे.समुद्रांच्या मोठ्या लाठांचे तडाखे किनारपट्टीला बसत आहेत.उद्या गुरूवारी पोर्णिमेला समुद्राला उधाण येण्याची शक्यता असल्यानं बंदर विभागानं नागरिकांना व मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिलाय.मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्राज जाऊ नये तसेच किनाऱ्या लगतच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.मांडवा ते मुंबई दरम्यान चालणारी प्रवासी वाहतूकही थांबविण्यात आली आहे.

मान्सून दाखल होण्यापुर्वी समुद्रातील हालचाली बदलण्यास प्रारंभ होत असला तरी अजूनही मान्सूनचे आगमन दृष्टीपथात नाही.संपूर्ण रायगड जिल्हा उष्म्यानं त्रस्त झाला असून पाऊस कधी येतो याकडं जनता आणि शेतकरी डोळे लावून बसले आहेत.गत वर्षी रायगडमध्ये 1 जून रोजी मान्सून दाखल झाला होता.या पार्श्वभूमीवर यंदा 80 ते90 टक्के शेतकऱ्यांनी धुळवाफांची पेरणी पूर्ण केली आहे.त्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here