फिटनेस क्लबच्या उदघाटनाच्या निमित्ताने लातूरला एका कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या अभिनेत्री सनी लिओनील विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. सनीच्या उपस्थितीत पार पडणारा हा कार्यक्रम संध्याकाळी करण्याचं ठरलं होतं. पण, वेळेआधीच दुपारी हा कार्यक्रम उरकण्यात आला. दरम्यान, वेळेच्या या गोंधळातही सनीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सनी येणार असल्यामुळे अर्थात त्या ठिकाणी माध्यमांच्या प्रतिनिधिंनीही गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यापैकीच एका प्रतिनिधीच्या प्रश्नामुळे सनीला वेगळ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं.
पत्रकारांसोबत संवाद साधताना सनीला एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला. ‘आपण बोल्ड चित्रपटात काम करता, याबद्दल कधी वाईट वाटतं का?’ हा प्रश्न विचारताच कार्यक्रमाच्या आयोजकांनी आक्षेप घेत त्या वार्ताहराला हटकलं. पण, शब्दाला शब्द वाढत गेला आणि हे प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत येऊन पोहोचलं. णाऱ्या त्या वार्ताहरावर इतरांची हरकत पाहून सनीनेही ‘इट्स ओके’ म्हणत प्रसंग सांभाळून नेण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय हे प्रकरण पुढे आणखी चिघळणार नाही, याची काळजीही घेतली. या सर्व प्रकारानंतर आयोजकांनी सारवासारव करत त्या ठिकाणी माफीनामाही सादर केला. सनीसोबत घडलेल्या या प्रसंगामुळे कलाकारांसोबत माध्यमांची वर्तणूक आणि त्यामुळे सेलिब्रिटींना होणारा मनस्ताप हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.साभार लोकसत्तावरून