शरद पवार यांच्यावर माध्यमांनी अनेकदा टीका केली आहे.मात्र त्यांनी कधी माध्यमांबद्दल अपशब्द वापरले नाहीत.मात्र त्यांची पुढची पिढी माध्यमांना आपला शत्रू समजून वागत असते.अजित पवार नांदेडला पत्रकाराला काय बोलले हे जगजाहीर आहे.आता सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार आणि माध्यमांवर आगपाखड केली आहे.दोन दिवसांपूर्वी जेजुरी येथे नाझरे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याच्या नियोजनाची बैठक होती.खा.सुप्रिया सुळे बैठकीस उपस्थित होत्या.यावेळी बोलताना त्या अचानक माध्यमांवर घसरल्या.त्या म्हणाल्या मी कधीही वर्तमानपत्र वाचत नाही.त्यातील बातम्या खऱ्या नसतात.पत्रकारितेवर माझे राजकारण कधीच अवलंबून नव्हते.माझे राजकारण जनतेवर अवलंबून आहे.वर्तमानपत्रावर विश्वास ठेवू नका.गेली अनेक वर्षे माध्यमं पवार साहेबांवर खालच्या पातळीवरून टीका करीत आहेत मात्र त्यांना त्यांच्याविरोधात चिंधीही सापडली नाही.निवडणुकीच्या काळात पत्रकार पॅकेज मागतात.पेड न्यूज शिवाय बातम्याच येत नाहीत.असा अनुभव आहे.अशी कुठे पत्रकारिता असते काय. अशा शब्दात त्यांनी माध्यमांना धारेवर धरले.
बैठकीनंतर पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांजवळ आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.त्यानंतर सायंकाळी खा.सुळे यांनी जेजुरीतील पत्रकारांशी संपर्क साधूीन,मला ग्रामीण पत्रकाारांबद्दल काही म्हणायचे नव्हते,लोकसभा निवडणुकीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आलेल्या अनुभवावरून मी असे बोलले असा खुलासा त्यांनी केला.( दैनिक जनप्रवासच्या 27 तारखेच्या अंकावरून साभार )