अलिबागः राम मंदिरासाठी म्हणून अयोध्येत आणलेल्या विटा या राम मंदिरासाठी नव्हत्याच तर त्या सिंहासनापर्यंत पोहचण्यासाठीच्या पायर्या होत्या असा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज रायगड जिल्हयातील महाड येथे केला.
रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.आपल्या भाषणात उध्दव ठाकरे यांनी वाढती महागाई,जुमलेबाजी,राम मंदिर,दुष्काळ आदी मुद्यांना स्पर्श करीत सरकारचा समाचार घेतला.
उध्दव ठाकरे म्हणाले,एकादा तुम्ही सांगा की,राम मंदिर जुमला होता तुम्ही 280 वरून 2 वर आल्याशिवाय राहणार नाही..
जनतेची कामं करून घेण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत असा खुलासा करीत शिवसेना ही अंकुश आहे आणि ती सत्तांध हत्तीवर अंकुश ठेवण्याचं काम करीत आहे असे स्पष्ट करून उध्दव ठाकरे म्हणाले,राज्यात पाण्याचा दुष्काळ आहे पण थापांचा दुष्काळ नाही निवडणुका येताच भ्रमाचे भोपळे,गाजरं गावागावात वाटली जातील त्यामुळं लोकांपर्यंत जा आणि मोदी सरकारचा त्यांना काय फायदा झाला ते त्यांना विचारा असा आदेश त्यानी कार्यकर्त्यांना दिला.
मेळाव्यास रायगड आणि रत्नागिरी जिल्हयातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.