पुणे जिल्हयातील वालचंदनगर येथील सकाळचे बातमीदार सचिन लोंढे यांच्यावर आज एका मटका चालकाने हल्ला केला आहे.त्यात ते आणि त्यांचा भाऊ जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. मारहाणीत सचिन लोढे यांचा हात फ्र्रक्चर झाला आहे. मटका आणि अन्य बेकायदा धंद्याच्या विरोधात सचिन लोंढे बातम्या देत असल्याच्या रागातून यापूर्वी देखील त्यांच्यावर हल्ला केला गेला होता.
या घटनेची पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाने गंंभीर दखल घेतली असून आरोपीवर कडक कारवाई करावी यामागणीसाठी उद्या एक शिष्टमंडळ पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना भेटत आहे.पुणे जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्ल्याचा निषेध केला असून घडलेल्या प्रकाराची माहिती आर.आऱ.पाटील यांच्या कानावर घातली गेली आहे.