मराठी पत्रकार परिषद राष्ट्रीय अधिवेशन शेगाव
परिसंवाद
संपादक ही व्यवस्था आता केवळ नावापुरती उरली आहे काय ?
एक काळ असा होता की,वर्तमानपत्र संपादकांच्या नावावरून ओळखले जात असे .कोणत्या पत्राचा कोण संपादक आहे हे पाहूनच वाचकही वृत्तपत्र घेत.संपादकाचा समाजात आणि वृत्तपत्र कार्यालयातही दबदबा आणि दरारा असायचा.संपादकाचं हे महत्व ही अनेक व्यवस्थापनाची पोटदुखी असल्यानंच क्रमशः संपादकांचं मह्त्व कमी केलं गेलेलं आहे.आजची वर्तमानपत्रे संपादकांच्या नावावर तर चालत नाहीतच पण कोणत्या पत्राचा संपादक कोण आहे हे देखील वाचकांना माहिती नसते.एवढेच कश्याला ‘संपादक नसला तरी वृत्तपत्र चालते’ अशी भाषा अनेक मालक वापरताना दिसतात.त्यामुळं प्रश्न पडतो की,संपादक ही व्यवस्था आता केवळ नावापुरती उरली आहे काय ?
मराठी पत्रकार परिषदेच्या शेगाव येथील अधिवेशनात याच विषयावर परिसंवाद होत असून यामध्ये सहभागी होत आहेत,ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे,प्रसाद काथे ( संपादक आयबीइन -लोकमत) ,प्रवीण बर्दापूरकर (ज्येष्ठ पत्रकार) ,सुशील कुलकर्णी (संपादक एकमत ) आणि गजानन निमदेव (मुख्य संपादक तरुण भारत नागपूर ) .19 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 2 ते 3.30 या कालावधीत हा परिसंवाद होत आहे.सध्याच्या काळातील महत्वाच्या विषयावरचा हा परिसंवाद नक्कीच पत्रकारांना नवा विचार देणारा ठरणार आहे..