ज्येष्ठ पत्रकार आणि आउटलूक मॅगझीनचे संपादक विनोद मेहता यांचे दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. अनेक अवयव निकामी झाल्याने आज सकाळी त्यांचे निधन झाल्याची माहिती एम्सचे प्रवक्ते अमित गुप्ता यांनी दिली. मेहता ७३ वर्षांचे होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेहतांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसंच पत्रकारितेचे मोठे नुकसान आहे, अशी भावना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मेहतांचे निधनानंतर व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन मेहतांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मेहतांचं निधन धक्का देणारं आणि दुःखदायी असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी म्हटलंय. दुःख व्यक्त केलं आहे. मेहतांना देशभरातील माध्यमांमधून तसंच विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.मेहतांचा जन्म पाकिस्तानमध्ये रावळपिंडीत १९४२ ला झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं. विनोद मेहता यांचं ‘लखनऊ बॉय’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पहिल्यांदा ते १९७४ मध्ये डेबोनियर मॅगझीनचे संपादक झाले. यानंतर संडे ऑब्झर्व्हर, इंडियन पोस्ट, द इंडिपेंडेंट, द पायोनियर आणि शेवटी आउटलूक या मॅगझीनचे ते संपादक होते.