वॉश्गिट पोस्टचे निवृत्त संपादक बेन ब्रेडली यांचं काल वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं.वॉटर गेट प्रकरण जेव्हा वॉश्गिटन पोस्टनं उजेडात आणलं तेव्हा ब्रेडली दैनिकाचे संपादक होते.राष्ट्रपती रिचर्ड निक्शन यांच्या सहकाऱ्यांच्या बेकायदा कामाच्या बातम्यासाठी बॉब वुडवर्ड आणि कार्ल ब्रेनस्टाईन या वार्ताहरांची नियुक्ती केली होती.वॉशिग्टन पोस्टनं वॉटर गेट प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानं निक्शन यांना 1974 मध्ये राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.1968 ते 1990 या काळात ्रब्रेडली वाशिग्टन पोस्टचे संपादक होते.त्यांनी या दैनिकाला प्रतिष्टा प्राप्त करून दिली.अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट संपादकांमध्ये ब्रेडली यांची गणती व्हायची.