ठाणे, :’इंडिया अनबाउंड’चे संपादक नित्यानंद पांडे यांच्या हत्येचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका महिला इंटर्नसह एका कर्मचाऱ्याला ताब्यात गेतलं आहे. पांडे यांचं शव रविवारी भिवंडीच्या खरबूमधील खार्डी गावात एका नाल्याजवळ आढळलं. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

नित्यानंद पांडे हे 15 मार्चपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. लैंगिक छळ केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी सोमवारी सांगितलं की, ही हत्या गेल्या 2 वर्षांआधी पांडे यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे झाली आहे. तपासानुसार, महिला 3 वर्ष पांडे यांच्यासोबत काम करत होती. गेल्या 3 वर्षांपासून महिलेवर लैगिंक अत्याचार होत होते. त्यानंतर महिलेने उमा शंकर यांच्यासोबत प्लान करत संपादकाची हत्या केली आहे.

पोलिसांनी सांगितल्या नुसार, महिलेने नित्यानंद यांना एका फ्लाटवर बोलवलं. त्यानंतर ड्रिंगमधून त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. नित्यानंद पांडे बेशुद्ध झाल्यानंतर महिला आणि मॅगझिनचे प्रिंटर सतीशने त्यांचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या दोघांनी पांडे यांच्या मृतदेहाला एका कारमध्ये टाकून भिवंडीला घेऊन गेला आणि एका जंगालात फेकून दिलं.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी सांगितलं की, कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर पहिला संशय हा महिला इंटर्नवर आला. त्यावेळी दोघांमध्ये 2 तास फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर पोलिसांनी महिला इंटर्नला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने संपूर्ण गुन्ह्याची कबूली दिली

(Visited 63 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here