संपादकाचा मृतदेह आढळला
मुंबई :इंडिया अनबाऊंड मासिकाचे संपादक नित्यानंद पांडे यांचा मृतदेह भिवंडीतील खारबाव गावातील पुलाखाली आढळला आहे.. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्यांचा खून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
पांडे यांच्या मासिकाचे मुख्य कायाॅलय अंधेरीत असून संपादकीय काम मीरा रोड येथील कायाॅलयातून चालते.
१५ मार्च रोजी ऑफिसला जातो असे सांगून पांडे घराच्या बाहेर पडले ते परत आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी काशिमीरा पोलिसात तक्रार दिली होती. आज त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळाला. शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
(Visited 92 time, 1 visit today)