संपादकांची औकात काय ?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहांच्या बाबतीत माध्यमांनी ब्र काढता कामा नये अशी व्यवस्था होताना दिसते आहे.द वायरनं जय शहा याचं प्रकरण बाहेर काढल्यानंतर त्याचा अनेक वृत्तपत्रांनी फॉलोअप घेऊन वेगवेगळ्या बातम्या देण्याचा प्रयत्न केला.मात्र अनेक वृत्तपत्रांवर दबाव आणून बातम्या प्रसिध्द होण्यापुर्वीच त्या ऑनलाईन इडिशनवरून काढण्यास भाग पाडले गेले.सर्वाधिक खपाच्या एका इंग्रजी वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीतून जय शहाच्या संदर्भातली बातमी अशीच हटविली गेली.ती नंतर प्रिन्टमध्येही आली नाही.एनडीटीव्हीच्या बाबतीतली बातमी अशीच धक्कादायक आहे.एऩीटीव्हीचे मॅनेजिंग एडिटर श्रीनिवासन जैन आणि त्यांचे सहकारी मानस प्रताप सिंग यांनी जय शहा यांच्या कंपनीला कसे कर्ज दिले गेले याबाबतचा रिपोर्ट पुराव्यासह एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर पोस्ट केला होता.मात्र ‘कायदेशीर अडचणीमुळे हा रिपोर्ट वेबसाईटवरून काढावा लागतोय’ असं एनडीटीव्हीच्या वकिलांनी सांगितल्यानंतर तो मजकूर तेथून हटविण्यात आला.त्यानंतर आठ दिवस झाले तरी तो मजकूर प्रसिध्द झालेला नाही.या संदर्भात श्रीनिवासन जैन यांनी ट्विट करून आणि आपल्या फेसबुक वॉलवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करीत हे दुदैर्वी असल्याचे म्हटले आहे.’जो रिपोर्ट पोस्ट केला होता तो सत्यावर आधाऱित होता,त्यातून कोणतीही कायदेशीर अडचण उद्दभवण्याचा प्रश्न नव्हता’ असे श्रीनिवासन यांनी आपल्या फेसबुकवर म्हटले आहे.एका प्रमुख वाहिनीच्या संपादकाचाच थेट मजकूर हटविला जात असेल तर माध्यमांमध्ये संपादकांची औकात काय आहे? याचा अंदाज येऊ शकेल.आम्ही सातत्यानं मांडतो आहोत की,सरकारला छोटी वृत्तपत्रे बंद करून सारा मिडिया दहा-पाच घराण्यांच्या ताब्यात द्यायचा आहे.असं झाल्यास त्यांच्यावर हवा तेव्हा हवा तसा दबाव आणूून आपल्या हवे तसे छापून आणता येऊ शकते किंवा आपल्या विरोधातला मजकूर थांबविता येऊ शकेल.गंमत अशी की,हा सारा प्रकार श्रीनिवासन जैन यांनी फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर आणला असला तरी अजूनही त्यांनी तेथे कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे.एका बाजुला पत्रकारांवर हल्ले करायचे,त्यांचे मुडदे पाडायचे,दुसर्या बाजुला त्यांच्यावर शंभर कोटीचे खटले दाखल करायचे आणि तिसर्या बाजुला मॅनेजमेंटला मॅनेज करून संपादकांना त्यांची औकात दाखवून द्यायची असे प्रकार सर्रास चालू असले तरी याला संघटीत उत्तर देण्याची हिंमत कोणी दाखविताना दिसत नाही.–
बघा श्रीनिवासन जैन यांनी आपल्या फेसबुक वॉलवर काय म्हटलंय ते…
A week ago, a report by Manas Pratap Singh and me on loans given to Jay Shah’s companies was taken down from NDTV’s website. NDTV’s lawyers said it needed to be removed for “legal vetting”. It has still not been restored. This is deeply unfortunate, since the report is based entirely on facts in the public domain and makes no unsubstantiated or unwarranted assertions. A situation like this presents journalists with hard choices. For now, I am treating this is as a distressing aberration and have decided to continue to do the journalism that I have always done – on NDTV. All of this has been conveyed to NDTV.