मुंबईः दिवाळीत अनेकजण पत्रकारांना भेट वस्तू देत असतात.संजय दत्तनंही दिली..पण ही भेट शिव्यांची होती.झालं असं की,दिवाळी निमित्त संजूबाबा फोटोग्राफर्सना पोज देत असताना तो थेट समोर बघतच नव्हता.तो इकडं तिकडं बघत राहिला.त्यावर फोटोग्राफर नीट पोज द्यायला सांगतात.मग संजू बाबा घरात जातो.पुन्हा तो बाहेर आल्यावर फोटोग्राफर पुन्हा पोज द्यायला सांगतात .मग मात्र तो फोटोग्राफरवर भडकतो.तो त्यांना जाण्यास सांगतो.तरीही फोटोग्राफर जात नाहीत म्हटल्यावर तो आणखीनच भडकतो.आणि मग फोटोग्राफरचा उध्दार करताना दिसतो.घरी जा..तुमच्या घरी दिवाळी नाही का असंही बोलताना दिसतो..मिडियाला शिव्या दिल्यावर तो घरात जातो.मग बाहेरचे दिवेही बंद होतात.
(Visited 58 time, 1 visit today)