धरमतर खाडी मच्छिमार व प्रकल्पग्रस्त समितीचे नेते श्याम म्हात्रे यांना काल अलिबाग न्यायालयाने 6 मार्चपर्यत पोलिस क ोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.त्यांच्या सोबतच्या 8 पुरूष आंदोलकांनाही 6 मार्चपर्यत तर 9 महिला आंदोलकांना 3 मार्चपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेश तांबे यांनी दिले आहेत.
सलग 18 दिवस अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कऱणाऱ्या आंदोलकांची सरकार दखल घेत नाही यामुळे चिडलेल्या मच्छिमार आंदोलकांनी शुक्रवारी दुपारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली होती.त्यात पाच पोलिस अधिकारी तसेच 9 पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.या प्रकऱणी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच 345 आंदोलकांना अटक केली होती.शनिवारी दुपारी या सर्वांना अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात आले.त्यापैकी न्यायालयाने 336 आंदोलकांची मुक्तता केली.उर्वरित आंंंदोलकांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.एकाच वेळी 345 आरोपींना न्यायालयात हजर करण्याची अलिबागच्या इतिहासातील ही पहिलीच घटना