शेती प्रश्‍नाकडं मिडियाचंही दुर्लक्षच-पी.साईनाथ

0
951

पी.साईनाथ मिडियाच्या रिपोर्टिंगवर नाराज
ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी मिडिया ज्या पध्दतीनं रिपोर्टिंग करतोय त्यावर सख्त नाराजी व्यक्त केलीय.ते म्हणतात,मिडिया ङाऊसेस प्रभावशाली पाच टक्के लोकांच्याच बातम्या देण्यात मश्गुल आहे.95 टक्के जनता मिडियापासून दूर आहे.ते म्हणतात,शेतकरी आत्महत्या करतो तेव्हाच शेतकरी हा मिडियासाठी बातमीचा विषय असतो.निवडणुकीचा मुद्दा जेव्हा शेतकरी बनतात तेव्हाही मिडियाचं त्यांच्याकडं लक्ष जातं.ऐरवी ते दुर्लक्षितच असतात.देशातील शेतकरी हवालदिल असताना मिडिया पाच टक्के लोकांसाठी काम करतोय.कृषी बिट कव्हर करणारे रिपोर्टर शेतकर्‍यांची दुःख मांडण्याऐवजी कृषी मंत्र्यांचं रिपोर्टिंग कऱण्यात धन्यता मानत असतात.जुलै महिन्यात दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडलं.

पी.साईनाथ म्हणाले,वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शेतकर्‍यांच्या एक टक्का बातम्या देखील नसतात.मिडिया हा महसुलासाठी चालविला जाणारा एक प्रोडक्ट बनला आङे.शेतकर्‍यांच्या बातम्या देऊन त्यांना अपेक्षित महसुल मिळविता येत नाही.गंमत अशी की ,125 कोटींच्या या देशातील बहुतेक नॅशनल डेलीत शेती बिट पाहणारे पत्रकारच नाहीत.ज्या डेलीत शेती पाहणारे रिपोर्टर आहेत ते देखील फिल्डवर जाऊन बातम्या कव्हर कऱण्याऐवजी सरकारी आकडे,जाहिराती आणि कृषी मंत्रालयाकडून मिळणार्‍या बातम्याच कव्हर करण्यात धन्यता मानतात.
साईनाथ म्हणाले,मी जेव्हा मिडियात आलो तेव्हा श्रम विभाग आणि कृषी विभागाचं रिपोर्टिंग करणारे रिपोर्टर नेमले जात.हळूहळू हे बंद झालं.परिणातः या क्षेत्राचा अभ्यास असलेले पत्रकारही दुर्मिळ झाले.त्यामुळं शेतकर्‍यांचे प्रश्‍न व्यवस्थितपणे जनतेसमोर येत नाहीत.जे पत्रकार शेतीवर लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या स्टोरीज दडपविण्याचा प्रयत्न होतो कारण याला वाचक नाही असं सांगितलं जातं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here