राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा कमी होत असला तरी शेतीवर अवलंबून असणार्या कुटुंबांची संख्या मात्र होती तेवढीच आहे.अशा स्थितीत शेतीचा विकासदर वाढविण्यासाठी अत्यांधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकर्यानी वापर करावा असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शितल तेली-उगवे यांनी काल केले.रायगड जिल्हा परिषद,महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा रायगडच्यावतीने अलिबाग येथे कृषी दिन साजरा कऱण्यात आला.यावेळी शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेती उत्पादन वाढीसाठी प्रयत्न कऱणार्या 37 शेतीनिष्ठ शेतकर्यांचा जिल्हाधिकार्यांच्या हस्ते गौरव कऱण्यात आला.कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे अन्य मान्यवर उपस्थित होते शेती ही केवळ पोटभरण्याचे साधन नसुन ती आपली संस्कृती आहे.अशा स्थितीत शेतकरी शेती कऱण्याच्या पध्दतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करावा असे आवाहन दिलीप पांढरपट्टे त्यांनी केले.