बांधावर शेतकऱ्यांचा सत्कार

0
801

रायगड प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम

रायगड प्रेस क्लब नेहमीच वैविद्यपूर्ण उपक्रम राबवत असते.समाजाच्या प्रश्नांना भिडण्याबरोबरच समाजात जी मंडळी चांगलं काम करते त्यांचं कौतूक करण्याचं कामही रायगड प्रेस क्लब करीत असतो.रायगड जिल्हयातील शेती सरकारी नीतीमुळ नामशेष होत असली तरी जी शेती आहे तेथे जिल्हयातील उपक्रमशील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत असतात.देशासाठी हे प्रयोग महत्वाचे असले तरी त्याची दखल घेतली जातेच असं नाही.त्यामुळे नव्या वाटेनं जाणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्या बांधावर जाऊन सत्कार करण्याचा आगळा वेगळा उपक्रम रायगड प्रेस क्लबनं हाती घेतला आहे.पहिल्या टप्प्यात येत्या 13 जुलै रोजी हा कार्यक्रम होत आहे.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार आणि परिषदेचे कोकण विभागीय चिटणीस मिलिंद अष्टीवकर यांच्या यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पाडला जाणार आहे.रायगड प्रेस क्लबचं अभिनंदन
गुणवंतांचा सत्कार
————
रायगड प्रेस क्लबसी संलग्न असलेल्या रोहा प्रेस क्लबच्यावतीनं शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला.प्रतिकूल स्थितीत ज्यां विद्यार्थ्यांनी दैपिप्यमान यश संपादन केलंय अशा मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचा हा सोहळा झाला.या सोहळ्यात आपलेपणा आणि आपुलकी ओतप्रोत भरलेली होती.त्यामुळंच रोहेकरांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला.या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे नुकत्याच रोह्याजवळ झालेल्या ट्रेन अपघातातत जे जखमी झाले होते त्यांना बोलावून त्यांच्या मानसिक जखमांवर फुकर मारण्याचं कामही या कार्यक्रमात केलं गेलं.रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष उदय मोरे,राजेद्र जाधव,जितेंद्र जोशी,पराग फकुणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here