शेतकर्यांच्या प्रश्नांकडं मिडिया कानाडोळ करतोय का?
विदर्भ आणि मराठवाडयातील शेतकर्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झालेला आहे.कर्जबाजारीपणातून बहुतेक आत्महत्या झालेल्या असल्या तरी याला फाटे फोडून विषयाचं गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर होताना दिसतात.अगोदरच्या सरकारच्या काळात किती आत्महत्या झाल्या आणि विद्यमान सरकारच्या काळात किती झाल्या याचंही चर्वितचर्वण सुरू असतं.वास्तव असंय शेतकरी साध्या साध्या प्रश्नावरून नाडला जातो.विमा भरणं खरं तर किती सुलभ गोष्ट ?.मात्र त्यासाठीही शेतकर्यांना तीन तीन दिवस बँकांसमोर रांगा लावाव्या लागत असतील आणि रात्र रात्र जागून काढावी लागत असेल तर परिस्थिती नक्कीच भीषण आहे याची खात्री पटते. ग्रामीण महाराष्ट्रात हे सारं घडत असलं तरी माध्यमांनी ज्या गांभीर्यानं या प्रश्नांची दखल घ्यायला हवी त्या गांभीर्यानं ते घेत नाहीत.टीआरपी मिळत नसल्यानं माध्यमं शेतकर्यांच्या प्रश्नाकडं कानाडोळा करतात अशी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांची सातत्यानं तक्रार असते .खरी स्थिती काय आहे? यावर जाणून घेणार आहोत मान्यवरांची मतं.’माध्यम ंशेतकर्यांच्या प्रश्नांकडं कानाडोळा करतात का? या परिसंवादात.शेतकरी नेते,राजकीय नेते आणि पत्रकारांच्या प्रतिनिधींमध्ये रंगणारी जुगलबंदी लक्षेवेधी ठरणार आहे.
सहभाग ः आ.डॉ,निलमताई गोर्हे,प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू,पत्रकार प्रकाश पोहरे,निशिकांत भालेराव, शेतकरी नेते विजय जावंधिया,चंद्रकांत वानखेडे आणि गंगाभीषण थावरे
20 ऑगस्ट 2017
वेळ सकाळी 10.30 ते 12.30