शेगाव अधिवेशनास येणार्या पत्रकार मित्रांसाठी महत्वाचे
मराठी पत्रकार परिषदेचे 41 वे अधिवेशन येत्या 19 आणि 20 ऑगस्ट 2017 रोजी बुलढाणा जिल्हयातील श्री क्षेत्र शेगाव येथे होत आहे.मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर शेगाव हे रेल्वे स्थानक असून नागपूरकडे जाणार्या बहुतेक गाडया शेगावला थांबतात.टॅव्हल्सने शेगावला येणार्या मित्रांना राज्याच्या बहुतेक शहरातून शेगावसाठी टॅव्हल्सची व्यवस्था आहे.मुंबई-पुण्याहून स्वतःच्या गाडीने शेगावला येणार्या पत्रकारांसाठी दोन मार्ग आहेत.पुणे -नगर-औरंगाबाद-जालना-मंठा-चिखली खामगाव आणि शेगाव हा एक मार्ग आहे तर दुसरा मार्ग पुणे-नगर-औरंगाबाद-सिल्लोड-बुलढाणा -शेगाव असा आहे.सिल्लोड मार्गे शेगाव वीस-पंचवीस किलो मिटरने जवळ आहे.नांदेड किंवा परभणीहून येणार्या मित्रांना मंठा मार्गे किंवा वाशिम-अकोला मार्गेही शेगावला येता येईल.सातार,कोल्हापूर किंवा रत्नागिरीहून येणार्या मित्रांनी बारामतीहून नगरला यावे तेथून औरंगाबाद मार्गे पुढे जाता येईल
शेगावमध्ये येणार्या पत्रकारांची निवास आणि भोजनाची व्यवस्था स्थानिक संयोजन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.त्यासाठी प्रत्येकी शंभर रूपये शुल्क द्यावे लागतील.शेगाव येथे पोहोचल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षातून आपणास आपल्या निवासाची माहिती मिळू शकेल.निवास व्यवस्था ते इंजिनिअरिंग कॉलेज ( जेथे आपला कार्यक्रम होत आहे ) हे अंतर साधारणतः दीड किलो मिटरचे आहे.काही ठराविक वेळेत तेथे वाहन व्यवस्था असणार आहे.भोजणाची आणि नास्त्याची व्यवस्था कार्यक्रम स्थळीच करण्यात आलेली आहे.काही अडचण आल्यास आपण राजेंद्रकुमार काळे ( मुख्य संयोजनक तथा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ ) यांच्याशी 9822593923 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
19 तारखेला सकाळी 10 वाजता उद्दघाटनाचा मुख्य सोहळा सुरू होईल.साधारणतः साडेबारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल.12.30 ते 2 वाजेपर्यंत भोजनाची वेळ असून कार्यक्रम ठिकाणीच ही व्यवस्था केली गेलेली आहे.दुपारी दोन वाजता एक परिसंवाद होईल तो 3.30 वाजेपर्यत चालेल.3.30 ते 4 ही चहापानाची वेळ आहे.4 वाजता दुसरे चर्चासत्र आहे.5.30 ते 7 कालावधीत पत्रकारांच्या न्यूजलेस कविता हा आगळावेगळा कार्यक्रम असेल.रात्री 8.30 ते 11 या कालावधीत मनोरंजनाचा कार्यक्रम आहे.
20 तारखेची सुरूवात सकाळी 9.30 वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या मुलाखतीने होईल.साधारणतः एक तासभर ही मुलाखत असेल.त्यानंतर 10.30 ते 12.30 या कालावधीत शेतकर्यांच्या प्रश्नांवरचा परिसंवाद होत असून यामध्ये शेतकरी नेते तसेच पत्रकार आपली भूमिका मांडणार आहेत.12.30 ते 2 या कालावधीत भोजन आणि विश्रांती.दुपारी 2 ते 3.15 या कालावधीत पत्रकार संरक्षण कायद्याची माहिती देणारी खुली चर्चा होईल.त्यानंतर 3.15 ते 4.15 या कालावधीत मराठी पत्रकार परिषदेचे खुले अधिवेशन होईल आणि शेवटी 4.30 ते 6 या कालावधीत समारोप होईल.निखिल वागळे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.
मित्रांनो ,अधिवेशनासाठी देशभरातून अडिच हजार पत्रकार येतील अशी अपेक्षा आहे.येणार्या पत्रकारांंची गैरसोय होऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत.परंतू उपस्थितीचा आकडा आणि कार्यक्रमाचा आवाका लक्षात घेता आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे अशी आमची नम्र विनंती आहे.कारण हा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे आणि तो यशस्वी करणे ही केवळ परिषदेची किंवा बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघांची जबाबदारी नाही तर येणार्या प्रत्येक पत्रकार मित्रांची ती जबाबदारी असल्याने आम्ही आपणास पुनश्च विनंती करीत आहोत की,आम्हाला आपले सहकार्य अपेक्षित आहे.
कळावे
राजेंंद्र काळे एस.एम.देशमुख
अध्यक्ष अध्यक्ष
बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद,मुंबई