अलिबाग- पंधरा वर्षात आघाडी सरकारने केवळ लुटमारीचे काम करीत राज्याला पिछाडीवर नेऊन ठेवले आहे अशा भ्रष्टाचारी सरकारला कायमचे उलथून टाका असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पनवेल येथील भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी काल रात्री नवीन पनवेल येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
आपल्या भाषणात फडणवीस यांनी शेकाप हा आता शेतकरी कामगारांचा पक्ष राहिला नसून तो धनदांडग्यांचा पक्ष झाल्याची टीका केली.देवेद्र फडणवीस यांनी खारघर येथील टोलमधून स्थानिकांना सूट देण्याचे आणि सरकार आल्यास प्रशांत ठाकूर यांना मंत्री कऱण्याचे आश्वासन दिले.