राष्ट्रवादी आणि कॉग्रेस आघाडीला छेद देत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अ.र.अंतुले यांनी मावळ आणि रायगडमधील शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप आणि रमेश कदम यांना आशीर्वाद दिल्याने रायगड जिल्हा कॉग्रेसमध्ये अस्वस्थतः पसरली आहे.रायगड जिल्हयात आता पर्यत शेकाप विरूध्द कॉंग्रेस अशीच लढत झाली आहे.स्वतः अंतुलेंना देखील अनेक वेळा शेकापच्या कडव्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते.असे असतानाही अंतुले यांनी शेकापच्या उमेदवारांना आशीर्वाीद दिल्याने हा विषय रायगडमध्ये चर्चेचा झाला आहे.
शेकापच्या नेत्यांनी नुकतीच मुंबईत अंतुले यांची आपल्या दोन उमेदवारांसह भेट घेतली.त्यावेळी अंतुले यांनी शेकापला आशीर्वाद दिले अशी माहिती शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी अलिबाग येथे पत्रकार पऱिषदेत दिली.
रायगडची जागा कॉग्रेस लढवावी यासाठी अ.र.अंतुले आग्रही होते .त्यासाठी त्यांच्या जावयाला तिकीट मिळावे असाही त्यांचा प्रयत्न होता पण पक्षाने ते अमान्य केल्याने अंतुले नाराज असल्याची चर्चा आहे.