सोमवारपासून एचटीच्या अनेक आवृत्यांना टाळे,
नोटा बंदीच्या सरकारी निर्णयाचा लाभ उचलत आता मोठ्या मिडिया घराण्यांनी आपल्या आवृत्या बंद करायला सुरूवात केली आहे.हिंदुस्थान टाइम्सनं याबाबत आघाडी घेतली आहे.नोटा बंदीचं निमित्त करून एचटीने भोपाळ,इंदोर,रांची,कानपूर,अलाहाबाद आणि कानपूर आवृत्यांना तर टाळे लावले आहेच त्याचबरोबर कलकता ब्युरोही बंद केला आहे.पुढचे पाऊल म्हणून पाटणा,लखनौ आणि मुंबई आवृत्तीमध्येही आता पत्रकारांना घरचा रस्ता दाखविणयाची तयारी सुरू झाली आहे.एचटीच्या या निर्णयाचा फायदा शेकडो पत्रकारांना बसू लागला असला तरी त्याविरोधात कुठेही
आवाज उठताना दिसत नाही.लोकांच्या प्रश्नांसाठी आयुष्य वेचणारे पत्रकार जेव्हा आपल्यावर वेळ येऊ लागली तेव्हा मूग गिळून बसले आहेत.श्रमिक पत्रकार संघानंही याबाबत मौन धारण केलेलं दिसतंय.उद्या सोमवारपासून एचटी वरील आवृत्यांना टाळे लावत आहे.–